Home /News /videsh /

10 वर्षांच्या पॅलेस्टिनी चिमुरडीच्या या VIDEO ने सारं जग कळवळलं, परिस्थिती पाहू तुम्हीही व्हाल सुन्न

10 वर्षांच्या पॅलेस्टिनी चिमुरडीच्या या VIDEO ने सारं जग कळवळलं, परिस्थिती पाहू तुम्हीही व्हाल सुन्न

इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील दहशतवादी गट हमास यांच्यात सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. इस्रायली सैन्याने Air Strike केला. त्या दरम्यान या छोट्या मुलीचा VIDEO सोशल मीडियावर आला आहे.

नवी दिल्ली, 17 मे: इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील दहशतवादी गट हमास यांच्यात सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. त्याबदद्लच्या बातम्या दररोज विविध माध्यमांतून पहायला मिळत आहेत. इस्रायल गाझा पट्टीतील विविध इमारतींवर क्षेपणास्र हल्ले करत आहे आणि तिथल्या इमारती पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळत आहेत. याचे अनेक व्हिडिओ बातम्या आणि सोशल मीडियातून जगभर पोहोचत आहेत. पण आज आलेला व्हिडिओ पाहून मात्र सगळं जगच कळवळलं आहे आणि तो पाहणाऱ्याला अश्रू अनावर झाले आहेत. नवभारत टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. युद्धाच्या कथा रम्य असतात पण प्रत्यक्ष युद्ध रम्य नसतं याचा प्रत्ययच या व्हिडिओतून येत आहे. इस्रायली हल्ल्यांमुळे कोसळलेल्या पॅलेस्टाइनमधल्या इमारतींच्या परिसरात राहणाऱ्या 10 वर्षांच्या नादिन अब्देल-तैफ (Nadine Abdel-Taif) या मुलीचा हा व्हिडिओ आहे. ती मुलगी रडून व्हिडिओत आपली व्यथा मांडते आहे. तिचा साधा प्रश्न आहे आम्हालाच हा त्रास का दिला जायोत. या व्हिडिओत ती म्हणते,‘मी खूपच चिंतेत आहे. मला काय करायचं हेच कळत नाहीए. आणि तुम्ही माझ्या आजुबाजूला हे बघताय (असं म्हणत ती आजाबाजूच्या कोसळलेल्या इमारतींचा राडारोडा दाखवते आणि विचारते) यात मी काय करू शकते? मी हे सगळं ठीक करावं?मी कसं हे सगळं ठीक करणार मी फक्त 10 वर्षांची आहे. मी या परिस्थितीशी यापेक्षा अधिक लढू शकत नाही.’ मला डॉक्टर व्हायचंय नादिन म्हणते,‘आमच्या माणसांची मदत करण्यासाठी मला डॉक्टर होण्याची इच्छा आहे पण मी ते आता करू शकत नाही कारण मी 10 वर्षांची आहे. मला भीती वाटते आहे मी काय करावं हेच कळत नाहीए.’ तिच्या मागे पडलेल्या बिल्डिंगच्या राड्यारोड्याकडे बोट दाखवून ती म्हणते,‘मी हे सगळं रोज पाहते आहे आणि रोज रडते आहे. माझं मलाच प्रश्न पडतो की आम्हालाच का हे भोगावं लागतंय?आम्ही काय केलं आहे ज्यामुळे आम्हाला हे भोगावं लागतंय?माझे कुटुंबीय मला सांगतात की आम्ही मुस्लिम आहोत म्हणून ते (इस्रायली) आपला द्वेष करतात. पण हे पहा माझ्या आजूबाजूला सगळी मुलं आहे. ही मुलं आहेत त्यांच्यावर क्षेपणास्र डागून तुम्ही त्यांना का मारून टाकता? तुम्ही असं का करता?’ Middle East Eyeने गाझा पट्टीतून हा व्हिडिओ 15 मेला रिपोर्ट केला आहे. हा 1.19 मिनिटांचा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड झाल्यापासून आतापर्यंत 11.5Mलोकांनी पाहिला आहे तर 63.1Kलोकांनी लाईक केला आहे. 32.8Kवेळा रिट्विट झाला असून 1.2Mप्रतिक्रिया त्यावर आल्या आहेत. जगभरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये इंग्लंडचा क्रिकेटपटू सॅम बिलिंग्जचाही समावेश आहे. या मुलीच्या निरागस भावनांनी गाझापट्टीतील नागरिकांची व्यथाच संपूर्ण जगासमोर मांडली आहे. दरम्यान इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.‘गाझा पट्टीतील दहशतवादी गट हमासविरुद्धची ही कारवाई संपूर्ण शक्तीनीशी सुरूच राहिल. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत आम्ही ही लष्करी कारवाई सुरू ठेवणार आहोत. शांतता प्रस्थापित होण्यासाठी अजून वेळ लागेल,’ असा इशाराच त्यांनी दिला आहे.
First published:

Tags: Israel, Video viral

पुढील बातम्या