बीजिंग, 27 मार्च : कोरोनाव्हायरसचे मुळ चीनपासून सुरू झाले. चीनमध्ये तीन हजारहून अधिक लोकांचा जीव घेतल्यानंतर आता काही प्रमाणात त्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. चीनमधील जवळजवळ 78 हजार लोकं निरोगी झाली आहेत. केवळ 5 हजार लोकं सध्या उपचार घेत आहेत. मात्र कोरोनाचे केंद्र स्थान असलेल्या वुहानमध्ये सध्या एक धक्कादायक प्रकार घडत आहे. शहरातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार निरोगी झालेल्या रुग्णांपैकी 10% रुग्णांना पुन्हा कोरोना झाला आहे. हे कसे घडले ते मात्र अद्याप कोणाला कळू शकलेले नाही.
दक्षिण चीन मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, वुहानमधील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांना कोरोना पुन्हा होत असल्याचे आढळले आहे. मात्र यामागचे कारण डॉक्टरांना अद्याप शोधता आलेले नाही आहे. कदाचित कोरोनाला रोखण्यासाठी किंवा मारण्यासाठी जे औषधे वापरली जात आहे, त्यांचा परिणाम संपल्यानंतर पुन्हा हा व्हायरस विकसित होत असावा. त्यामुळं आता चीनसमोर एक वेगळेच आव्हान आहे.
वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष पॅकेज, मोदी सरकारच्या 7 मोठ्या घोषणालोकांशी केली जात आहे चर्चा
वुहानमधील टोंगजी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की या रुग्णालयात निरोगी व्यक्तीला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यत: याच रुग्णालायत सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या मते, अद्याप नवीन संसर्गाचे कारण शोधण्यात आले आहे आणि संक्रमित लोकांच्या कुटुंबांशी चर्चा केली जात आहे.
वाचा-डॉक्टरच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, 800 लोकांचा जीव धोक्यात10 पैकी 3 लोकांना पुन्हा झाला कोरोना
टोंगजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. वांग वेई यांनी, रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांपैकी 5 ते १०% रुग्णांना पुन्हा कोरोना संसर्ग होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याशिवाय पीपल्स डेलीच्या हेल्थ जर्नल लाइफ टाईम्सनेही दावा केला आहे की वुहानमध्ये बरे झालेल्या कोरोना रूग्णांपैकी 5 ते 10% रुग्णांना पुन्हा संसर्ग झाला आहे. या अहवालात वुहानमध्ये राहणाऱ्या एका कुटूंबाचा उल्लेखही करण्यात आला आहे.
वाचा-कोरोनाचं नवं केंद्र झालं स्पेन! मृतांच्या शेजारी झोपत आहेत जवानतज्ज्ञांनी टेस्टवर उपस्थित केले सवाल
वृत्तानंतर कोरोनासाठी घेण्यात येणाऱ्या असलेल्या चाचणीवरही अनेक तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकांच्या शरीरात असलेला कोरोना न्यूक्लिक अॅसिड चाचणीला मात देण्यास सक्षम नाही आहे ? दरम्यान, निरोगी झालेले रुग्ण कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले नव्हते. सध्या वुहानच्या रूग्णालयाव्यतिरिक्त, चीनमधील इतरही अनेक रुग्णालयात तपासणी सुरू आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.