मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

'ट्रम्प सरकार'मुळे भारताला ताकही फुंकून प्यावं लागणार !

'ट्रम्प सरकार'मुळे भारताला ताकही फुंकून प्यावं लागणार !

अजय कौटिकवार, 16 नोव्हेंबर : डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भारत अमेरिकेचे संबंध कसे असतील याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झालीय. ट्रम्प यांनी प्रचारात भारताबद्दल प्रेम व्यक्त केलं होतं. मात्र, आता सत्तेत आल्यानंतर ते प्रत्यक्षात धोरणांमध्ये उतरतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अमेरिकेतल्या भारतीयांची भलामण करणारं डोनाल्ड ट्रम्प यांचं निवडणूक प्रचारातलं हे भाषण...या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचं कौतुक केलं आणि मला हिंदू संस्कृती आवडते असं सांगत भारतीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.ट्रम्प यांना निवडणुकीसाठी पैसे गोळा करण्यात आणि त्यांच्या निवडणूक कॅम्पेनमध्येही अनेकभारतियांची महत्वाची भूमिका होती. एवढंच नाही तर त्यांनी 'अबकी बार ट्रम्प सरकार'असा व्हिडीओही तयार केला होता. donald trump4डोनाल्ड ट्रम्प यांची आता अध्यक्षपदी निवड झाली, त्यामुळे...त्याचं भारताबाबतचं धोरण काय असेल याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय. स्थलांतरीत आणि रोजगारांच्या संधींबाबत त्यांचं धोरण बघता. आपल्या नोक•यांवर गदा तर येणार नाही ना ? अशी काळजी अमेरिकेतल्या भारतीयांना आहे. मात्र, ट्रम्प यांचं भारतीयांबाबतचं धोरण मवाळ असेल असं बोललंय जातंय. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांमध्ये सरकार बदललं तरी फारसा बदल होत नाही. मात्र ट्रम्प यांच्या `दबंग` प्रतिमेमुळं भारतातच नाही तर जगभरातच भीती आणि उत्सुकता आहे. बराक ओबामांप्रमाणेच....पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची केमिस्ट्री चांगली जमेल असा अंदाज व्यक्त होतोय. त्यांच्या दहशतवादाबाबतच्या भूमिकेचा फायदा घेत भारत पाकिस्तानवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करेल असाही अंदाज व्यक्त होतोय. गेल्या काहीवर्षांमध्ये भारत आणि अमेरिकेत जवळीक वाढते आहे. मोदी सरकारच्या काळात त्यात वाढ झाली.असं असलं तरी ट्रम्प यांचा तापट स्वभाव पाहता भारताला धोरण ठरवताना ताकही फुंकून प्यावं लागणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Donald Trump, USA, अमेरिका, ट्रम्प

पुढील बातम्या