मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अफगाणिस्तानात भारतीय दुतावासावर हल्ला,9 ठार

अफगाणिस्तानात भारतीय दुतावासावर हल्ला,9 ठार

    afagan03 ऑगस्ट : अफगाणिस्तानच्या जलालाबादमधल्या भारतीय दुतावासावर हल्ला झालाय. इंडो तिबेटीन बॉर्डर पोलीसच्या डीजींकडून मिळालेल्या माहितीनुसार दुतावासातील सर्व भारतीय कर्मचारी सुखरूप आहेत.

    पण या आत्मघातकी हल्ल्यात दुतावासालगत असलेल्या एका मशिदीमधल्या नऊ जणांचा मृत्यू झालाय. यात आठ लहान मुलांचा समावेश आहे.

    तसंच तीन हल्लेखोरांचाही या हल्ल्यात मृत्यू झालाय. भारतीय दुतावासावरचा हा हल्ला मात्र आपण केला नाही असा खुलासा तालीबानने केला.

    First published:

    Tags: अफगाणिस्तान, ठार, भारत, हल्ला