• VIDEO : 'या' गावात भरते झुक झुक गाडी शाळा

    News18 Lokmat | Published On: Feb 2, 2019 03:28 PM IST | Updated On: Feb 2, 2019 03:28 PM IST

    सोलापूर, 2 फेब्रुवारी : अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी गावात भरते झुक झुक गाडी शाळा. गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेने अनोखी अशी झुक झुक गाडी बनवली आहे. चिमुकल्या मुलांच्या या शाळेत आगळ्या वेगळ्या प्रकारचे रंगकाम केल्याने संपूर्ण शाळेला रेल्वे गाडीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची संख्याही वाढली आहे. गावातील दानशूर व्यक्ती रविकांत बिराजदार यांनी स्वखर्चानं या शाळेचं संपूर्ण रंगकाम केलं. याआधी शाळेचे रंगकाम पूर्णपणे खराब झाले होते. शाळेच्या खोल्यांची काहीशी पडझड देखील झालेली होती. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची गैरसोय पाहता शाळेचं नुतनीकरण आणि रंगकाम करणं गरजेचं झालं होतं. सध्या या संपूर्ण शाळेला आगगाडीचे हुबेहुब स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे दैनंदिन वाढत्या अभ्यासक्रमा ताण न घेता या शाळेतले विद्यार्थी मनोरंजनातून शिक्षण घेत आहेत. या शाळेचा आढावा घेतलाय न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधीसागर सुरवसे यांनी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading