• काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताचा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Dec 20, 2018 07:59 PM IST | Updated On: Dec 20, 2018 11:36 PM IST

    धनबाद, 20 डिसेंबर : 'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' या म्हणीचा प्रत्यय बुधवारी झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात पहावयास मिळाला. धनबादच्या वासेपुरात एका बाईक चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या एका 12 वर्षाच्या मुलाला जोरदार धडक दिली. घटनास्थळाजवळच एका घरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. मार्ग ओलांडत असताना मागून भरधाव आलेल्या बाईक चालकाने मुलाला जबर धडक दिली. यात तो दूरवर फेकल्या गेला. मात्र त्याचं दैव बलवत्तर म्हणावं लागेल. त्या मुलाला काहीच झालं नाही. थोडंफार खरचटल्यामुळे तो मुलगा आणि बाईकचालक किरकोळ जखमी झाले. घटना घडली तेव्हा स्थानिकांनी धाव घेत दोघांना सावरलं. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या अपघातातून दोघांचाही प्राण वाचले, हा एक चमत्कार असल्याचं प्रत्यक्षदर्शिंनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी