• VIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके

    News18 Lokmat | Published On: Dec 14, 2018 11:21 PM IST | Updated On: Dec 14, 2018 11:36 PM IST

    सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी औरंगाबाद, 14 डिसेंबर : औरंगाबादमध्ये अभिनेत्री झरीन खान एका मोबाईल शाॅपीच्या उद्घाटनाला आली होती. त्यावेळी तरुणांनी तिला धक्काबुक्की केली. झरीननेही या तरुणांना चांगलाच चोप दिला. औरंगाबादच्या कॅनॉट प्लेसमध्ये सिलेक्ट या शोरूमच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध अभिनेत्री खान आली होती. या कार्यक्रमासाठी शोरूम मालकानं कुठलाही पोलीस बंदोबस्त न घेता खाजगी बाउन्सर लावले होते. चाहत्यांची गर्दी अचानक वाढल्याने बाउन्सर आणि लोकांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. या सगळ्यात अभिनेत्री झरीनसुद्धा मागे राहिली नाही. तिनेही एका चाहत्याच्या कानशिलात वाजवली. त्यामुळे अभिनेत्री झरीन खान हिला तब्बल दोन तास शोरूममध्येच अडकून पडावं लागलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी