• VIDEO : 'अवनी'चे दोन बछडे कॅमेऱ्यात झाले ट्रॅप

    News18 Lokmat | Published On: Nov 17, 2018 06:33 PM IST | Updated On: Nov 17, 2018 06:41 PM IST

    यवतमाळ, 17 नोव्हेंबर : प्राणीप्रेमींसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी... टी-वन अर्थात अवनी ही वाघीण ठार झाल्यानंतर अनेक दिवसांपासून तिच्या बछड्यांचा शोध सुरु होता. अखेर 12 दिवसानंतर दोन्ही बछड्यांची पहिलीवहिली झलक समोर आलीय. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात दोन्ही बछडे कैद झालेत. 11 महिन्यांचे हे दोन्ही बछडे यवतमाळच्याच जंगलात आढळून आले आहेत. दरम्यान, या बछड्यांना जेरबंद करण्यासाठी देहरादून आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील तज्ज्ञ यवतमाळात दाखल झाले आहेत. नरभक्षक असल्याचं कारण देत वनविभागानं अवनीला गोळ्या घालून ठार केलं. त्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. दरम्यान, सोमवारपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 'टी-वन' वाघिणीच्या शिकारीवरुन कामकाज तापण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading