Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 3000 किलोची खिचडी शिजवणाचा विष्णू मनोहर यांचा विश्वविक्रम
  • VIDEO : 3000 किलोची खिचडी शिजवणाचा विष्णू मनोहर यांचा विश्वविक्रम

    News18 Lokmat | Published On: Oct 15, 2018 12:02 AM IST | Updated On: Oct 15, 2018 12:02 AM IST

    नागपूर, 14 ऑक्टोबर : नागपुरात आज चमचमीत खिचडी बनवण्याचा विश्वविक्रम प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी केलाय. खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावं यासाठी नागपुरातल्या चिटणीस पार्क स्टेडियमवर तीन हजार किलो खिचडी बनवण्याचा विश्वविक्रम केला गेला. ही खिचडी बनवण्यासाठी 510 किलो वजनाची भव्य कढई आणण्यात आली. आणि सकाळीच स्टेडियमभर खिचडीचा घमघमाट दरवळायला सुरूवात झाली.गेल्या वर्षीही खिचडी बनवण्याचा रेकॉर्ड करण्यात आला होता. त्यावेळी 1200 किलो खिचडी बनवण्यात आली होती. दरम्यान आज नागपुरात बनवण्यात आलेल्या खिचडीची चव चाखण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील हजेरी लावली होती. याशिवाय नागपुरकरांनी देखील विष्णू मनोहर यांनी शिजवलेल्या खिचडीवर ताव मारला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com