• होम
  • व्हिडिओ
  • हिंगोलीत खड्ड्यांमुळे रिक्षातच झाली प्रसुती, महिलेची प्रकृती गंभीर
  • हिंगोलीत खड्ड्यांमुळे रिक्षातच झाली प्रसुती, महिलेची प्रकृती गंभीर

    News18 Lokmat | Published On: Oct 29, 2018 12:27 PM IST | Updated On: Oct 29, 2018 12:27 PM IST

    हिंगोली, 29 ऑक्टोबर : राज्य सरकार एकीकडे खड्डे मुक्त महाराष्ट्र घोषणा करत आहे मात्र दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना या खड्ड्यांमुळे अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. या खड्ड्यांमुळे हिंगोलीमधील एका गरोदर महिलेची चक्क रिक्षामध्ये प्रसुती करण्यात आली आहे. काल रात्री 9 ते 10 वाजताच्या दरम्यान शीतल या महिलेला प्रसुतीसाठी रुग्णालयात नेत असताना ख़ड्ड्यांमुळे तिची रिक्षामध्ये प्रसुती झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला आहे. मात्र या महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला सेनगाव ग्रामीण रुगणालयात दाखल करण्यात आलं आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महिलेचा जिव गमावण्याची वेळ आलीय आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल का ? प्रश्न सर्वांसमोर आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी