BUNJEE JUMPING करताना तुटली दोरी, 80 फुटांवरून पडून झाला मृत्यू; पाहा धक्कादायक VIDEO

BUNJEE JUMPING करताना तुटली दोरी, 80 फुटांवरून पडून झाला मृत्यू; पाहा धक्कादायक VIDEO

बंजी जम्पिंग करताना दोरी तुटल्यामुळे 80 फुटांवरून (Woman dies while doing bungee junping) सरळ जमिनीवर कोसळल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

नुरसुल्तान, 11 ऑक्टोबर : बंजी जम्पिंग करताना दोरी तुटल्यामुळे 80 फुटांवरून (Woman dies while doing bungee jumping) सरळ जमिनीवर कोसळल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धाडसी खेळ खेळताना मृत्यू झाल्याच्या अनेक (Deaths while playing adventure sports) घटना यापूर्वीही घडल्या आहेत. धाडसी खेळांमध्ये एक चैतन्य आणि ऊर्जा असते. जगभरात अनेक लोक आपला (Life in Danger) जीव धोक्यात घालून धाडसी खेळ खेळत असतात. मात्र कधीकधी असे विचित्र अपघात होतात, की त्यात खेळाडूंना आपला प्राण गमवावा लागतो.

उडी मारेपर्यंत नव्हती कल्पना

कझाकिस्तानात राहणारी 33 वर्षांची येवजिनीया लिओन्तिया ही तीन मुलांची आई. गेल्या अनेक वर्षांपासून बंजी जम्पिंग हा तिचा आवडता खेळ. या खेळात कंबरेला दोरी बांधली जाते आणि उंचावरून व्यक्तीला खाली सोडलं जातं. काही अंतर खाली गेल्यानंतर ही दोरी लटकते आणि व्यक्तीला हवेत तरंगल्याचा भास होतो. हवेत तरंगत तरंगत ती व्यक्ती जमिनीवर येते. मात्र येवजिनियाच्या बाबतीत अखेरचं ठरलेलं बंजी जम्पिंग हे भयानक होतं.

असा झाला अपघात

येवजिनियानं कंबरेला दोरी बांधली. हा खेळ आयोजित करणाऱ्या कंपनीच्या वतीनं एका महिलेनं सर्व बाबींची खातरजमाही केली. येवजिनियाचा पती तिच्या बंजी जम्पिंगचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता. सर्व तयारी झाल्यानंतर येवजिनियानं खाली उडी मारली. मात्र तिच्या दोरीनं साथच दिली नाही. ती दोरी तुटली होती आणि येवजिनिया हवेत तरंगलीच नाही. ती थेट 80 फूट खोल जमिनीवर आदळली आणि नंतर दोरीसोबत ओढली जाऊन एका भिंतीवर आपटली.

हे वाचा - लातुर: गुटखा किंगला हादरा; 2 दिवसांच्या छापेमारीत तब्बल सव्वा कोटींचा गुटखा जप्त

जखमी येवजिनियाचा मृत्यू

गंभीर जखमी झालेल्या येवजिनियाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. दोरी तुटण्यामागे  काही घातपात होता का, याचादेखील पोलीस शोध घेत आहेत. बंजी जम्पिंग कऱणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by: desk news
First published: October 11, 2021, 8:41 PM IST

ताज्या बातम्या