Live मीटिंगमध्ये पत्नीचा रोमँटिक अंदाज, पतीच्या जवळ आली आणि..., व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Live मीटिंगमध्ये पत्नीचा रोमँटिक अंदाज, पतीच्या जवळ आली आणि..., व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

लाईव्ह मीटिंगमध्ये आपल्या नवऱ्यावर प्रेम प्रदर्शित करणाऱ्या एका पत्नीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी: लॉकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांना कंपनीत येणं शक्य होत नव्हत. त्यामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ (work from home) चा पर्याय उपलब्ध करून दिला होता. सुरुवातीला या पर्यायांचा कर्मचाऱ्यांना चांगलाच फायदा झाला पण नंतर मात्र घरून काम करताना कुटुंबातील इतर सदस्यांमुळे त्यांना अनेक समस्यांना देखील तोंड द्यावं लागलं.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात झूम मीटिंग, ऑनलाईन मीटिंगच्या वेळी बऱ्याचदा चुकून माईक चालू राहिल्याने किंवा कॅमेरा चालू राहिल्याने लोकांचे अनेक गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाले होते. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये लाईव्ह मीटिंग सुरु असताना एका व्यक्तीला त्याची पत्नी किस (kiss) करण्यासाठी येत असल्याचं दिसुन येत आहे.

अवश्य वाचा -   ‘Captain Cool’ चा डान्सिंग अंदाज; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान VIRAL

आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी ट्वीटर वर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये हा माणूस लाईव्ह मीटिंग मध्ये समोरच्याला काहीतरी माहिती सांगत आहे. तेवढ्यात त्याची पत्नी येऊन त्याला किस करण्याचा प्रयत्न करते आणि तो मागे होत मी ‘ऑन एअर’ आहे असं सांगत तिला झापतो. आणि ती तिथून निघून जाते.

या व्हिडीओवर लोकांनी खूप गमतीशीर कमेंट्स करत तो खूपच नशीबवान आहे आणि त्याला खूप प्रेम करणारी बायको मिळालीये असं देखील म्हटलंय.

आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी ट्वीटर वर हा व्हिडीओ शेअर करताना त्याला ‘वर्क फ्रॉम होम संकटात’ असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे.

Published by: news18 desk
First published: February 19, 2021, 6:54 PM IST

ताज्या बातम्या