पुणे, 22 जुलै : युतीबाबत 'आमचं ठरलंय' असं सगळे सांगत असतानाच सेना- भाजपवरून मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेला वाद नव्याने चव्हाट्यावर आला आहे. नव्हे सीएमपदावरूनच युतीत ठिगणी पडल्याची चिन्हं दिसताहेत...निमित्त आहे...मुख्यमंत्र्यांच्या कालच्या विधानाचं...शिवसेनेचाही मीच मुख्यमंत्री असं फडणवीसांनी म्हणताच..सेनेचा नक्कीच तिळपापड झाला असणार. पण उघडपणे कोणीच बोलायला तयार नाही.