• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लोक'शाई'उत्सवात कुठे बाँब हल्ले, तर कुठे मारामारी
  • VIDEO : लोक'शाई'उत्सवात कुठे बाँब हल्ले, तर कुठे मारामारी

    News18 Lokmat | Published On: May 6, 2019 08:27 PM IST | Updated On: May 6, 2019 08:27 PM IST

    पश्चिम बंगाल, 06 मे : देशभरातल्या 7 राज्यात मतदान पार पडत असताना अनेक राज्यात मतदानावेळी हिंसाचारही झाला. एकीकडे पश्चिम बंगालच्या बैरकपूरमध्ये भाजपचे उमेदवार अर्जुन सिंह यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. हल्ल्यासाठी गुंडांना बाहेरून आणण्यात आलं होतं असा आरोप भाजपचे उमेदवार अर्जून सिंह यांनी केला. तर दुसरीकडे तर तिकडे पश्चिम बंगालच्या बनगावात मतदान केंद्रावर बॉम्ब फेकण्यात आला. बनगावातल्या 96, 118 आणि 119 बुथवर हा बाँब हल्ला झाला. यावेळी भाजप पोलिंग एजंटला बुथमध्ये जाऊ दिलं जात नव्हतं असा आरोपही होत आहे. जम्मू काश्मीरमधल्या नायरा राजपूरा भागात पीडीपीच्या समर्थकानं काँग्रेसच्या पोलिंग एजंटला मारहाण केली. मतदान केंद्राच्या परिसरातच ही मारहाण झाली. तर परिगाव पुलवामा इथं राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदानादरम्यान दगडफेक केल्याचाही प्रकार घडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी