• VIDEO : एकच मोबाईल शॉप दुसऱ्यांदा फोडलं, पण...

    News18 Lokmat | Published On: Dec 26, 2018 05:26 PM IST | Updated On: Dec 26, 2018 07:09 PM IST

    विजय देसाई, विरार, 26 डिसेंबर : विरार पूर्वमधील नारंगी भागातलं एक मोबाईल शॉप दुसऱ्यांदा चोरट्यांनी फोडलं. चोरट्यांनी 25 डिसेंबर रोजी भल्या पहाटे या मोबाईल शॉपचं शटर तोडलं. मात्र, आतला काचेचा दरवाजा काही त्यांना उघता आला नाही. यामुळे त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. हा सर्व प्रकार त्या दुकानाबाहेर आणि आत लागलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. यापूर्वी 16 जुलै रोजी चोरट्यांनी हेच दुकान फोडून 3 लाखांचे महागडे मोबाईल आणि रोख लंपास केली होती. त्यानंतर विरार पोलिसांनी त्या घटनेतील एका चोराला उत्तर प्रदेशातून अटक केली आणि त्याच्याकडून 3 लाखांचा माल हस्तगत केला. चोरट्यांचा दुसरा प्रयत्न फसरा असला तरी, एका मोबाईल शॉप दुसऱ्यांदा फुटल्यामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पोलिसांनी पहाटेची गस्त वाढवावी जोर धरू लागली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी