28 डिसेंबर : आसाम येथील देशातील सर्वात मोठ्या ढोला-सदिया पुलावर अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. एक मुलगा पूल ओलांडत होता, तेव्हा भरधाव गाडीने त्याला चिरडलं. नव्या पुलावरून जात असताना गाडीतील एक व्यक्ती मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकाॅर्ड करत होती. त्यावेळी हा अपघात घडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अपघातानंतर या मुलाला डिब्रुगड येथील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, उपचारादरम्यान या मुलाची प्राणज्योत मावळली.