मुंबई, 02 मे : आतापर्यंत सेल्फीच्या नादानं अनेकांचा जीव गेला. सेल्फी किती धोकादायक असतो हे दाखवणारा हा व्हिडिओ मुंबई पोलिसांनी टि्वटर अकाऊंटवर शेअर केला आहे. सेल्फी घेताना तरूण इमारतीवरून खाली कोसळल्यानं त्याचा मृत्यू झाला. हा व्हिडिओ पाहून सेल्फीचा मोह टाळणं किती गरजेचं आहे, हे लक्षात येतं. मुंबई पोलिसांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की, एक तरूण उंच इमारतीच्या गच्चीवरून सेल्फी घेत आहे. सेल्फी घेण्यासाठी तो गच्चीच्या टोकावर येतो आणि गच्चीचा काही भाग तुटतो आणि त्यामुळे तो तरूण खाली कोसळतो.