• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • असले स्टंट तुम्ही करू नका ! चालत्या लोकलमध्ये मुलाने मारली उडी; VIDEO VIRAL

असले स्टंट तुम्ही करू नका ! चालत्या लोकलमध्ये मुलाने मारली उडी; VIDEO VIRAL

चालत्या ट्रेनमध्ये एका चिमुरड्याने जबरदस्त स्टंट केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 04 नोव्हेंबर: सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आजकाल कोण काय करेल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन काही लोकं रातोरात स्टार बनतात. असाच एक ट्रेनमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबईच्या लोकलमधील हा व्हिडीओ आहे. चालत्या गाडीमध्ये एका मुलाने स्टंट केला आहे. या व्हिडीओमुळे त्या मुलाला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. चालत्या लोकलमध्ये साधारण 10 - 12 वर्षाचा चिमुरडा उलटी उडी(Backflip) मारताना दिसत आहे. ट्रेनच्या मधल्या पॅसेजमध्ये या मुलाने स्टंट केला आहे. स्लो मोशनमध्ये व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. यावेळी ट्रेनमध्ये फारशी गर्दी नव्हती. इन्स्टाग्राम (Instagram)वर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओतला मुलगा नक्की कोण आहे हे अद्याप समजलेलं नाही.
  View this post on Instagram

  Power supply amazing flipper Khatarnak video ♥️ :#flipper #foryou : :#viral #arif_flipper : :#full : : : :♥️ : : :

  A post shared by arif _parkour (@arif_flipper_) on

  लोकलमधल्या या स्टंटच्या व्हिडीओला आत्तापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 39 हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओला लाइक केलं आहे. यावर एका नेटकऱ्याने कॉमेंट केली आहे, "ओ माय गॉड किती मस्त बॅकफ्लिप मारली आहे." दुसऱ्या युझरने म्हटलं आहे, "चालत्या गाडीमध्ये ब्लॅकफ्लिप मारणं अत्यंत कठीण काम आहे. या मुलामध्ये जबरदस्त टॅलेंट आहे." असं असलं तरी चालत्या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा स्टंट करणं अत्यंत धोकादायक आहे. आम्ही अशाप्रकारच्या कोणत्याही कृत्याचं समर्थन करत नाही.
  Published by:Amruta Abhyankar
  First published: