• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हृदय पिळवटून टाकणारा अपघात; घटना CCTVमध्ये कैद
  • VIDEO : हृदय पिळवटून टाकणारा अपघात; घटना CCTVमध्ये कैद

    News18 Lokmat | Published On: Jan 2, 2019 05:29 PM IST | Updated On: Jan 2, 2019 06:04 PM IST

    नवाशहर, 2 जानेवारी : हृदय पिळवटून टाकणारी घटना पंजाबमधील नवाशहर येथे घडली आहे. येथील एका मार्गावर बुलेरोने एका स्कुटर स्वार युवकाला चिरडलं. अपघात येवढा भीषण होता की तो युवक त्या गाडीखाली काहीवेळ दबलेला राहिला. ही घटना घडताच बुलेरो चालकाने आणखी वेगात गाडी दामटली. 31 डिसेंबर रोजी नवाशहराच्या बंगा तहसीलअंतर्गत येणाऱ्या मुकंदपूऱातील पुनिया या गावांत ही दुर्दैवी घटना घडली. अपघातात मृत पावलेला 23 वर्षाचा नवदीप एक्टिवा घेऊन करनाणा येथील त्याच्या गावी निघाला होता. पण मार्गातच त्याला भरधाव आलेल्या या बुलेरोने चिरडलं. त्यानंतर बुलेरो चालकाने घटनास्थळावरून आणखी जोरात गाडी पळवली. तात्काळ नागरिकांना नवदीपला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृच घोषीत केलं. हृदय पिळवटून टाकणारा हा अपघात CCTVमध्ये कैद झाला आहे. पोलीस CCTV फुटेजच्या आधारे घटनेचा तपास करीत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी