मुंबई, 02 नोव्हेंबर: लहान मुलांच्या मनात भुतांबद्दल फारच भीती असते. आणि एखाद्या लहान मुलाला भुताने उचलून नेलं तर? पुढे काय होईल याची कल्पना न करणंच चांगलं आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घरातल्या घरातच हा मजेदार व्हिडीओ (Funny Video) शूट करण्यात आला आहे. भुताच्या वेषात एक माणूस लहान मुलाला घेऊन जात आहे. असं या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
Ryan Shady नावाच्या एका ट्विटर युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. रायन यांनी एक कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, “माझ्या मुलाचं अपहरण झालं.” एखाद्या हॉलिवूड फिल्ममध्ये मुलाला पळवून नेण्याचा जसा प्रसंग दाखवला जातो. तसाच प्रसंग या मजेदार व्हिडीओमध्ये दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात मुलांचा आणि त्या भूत झालेल्या व्यक्तीचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे.