असं घेता शिंगावर, वळूने अल्टो कारच उचलली, VIDEO व्हायरल

असं घेता शिंगावर, वळूने अल्टो कारच उचलली, VIDEO व्हायरल

गावातल्या मोकाट वळूने एका कारवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या वळूने एक मारुती अल्टो कारच उलटून टाकण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

बिहार, 04 नोव्हेंबर : गावातल्या मोकाट वळूने एका कारवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या वळूने एक मारुती अल्टो कारच उलटून टाकण्याचा प्रयत्न केला.हा व्हिडिओ हाजीपूरमधील स्टेशन रोड परिसरातला आहे. एक मोकाट वळू अचानक उधळला आणि त्यानं बाजारात एकच गोंधळ घातला होता. त्यामुळे एकच धावपळ उडाली होती.

चौकात उभ्या असलेल्या मारूती अल्टो कारकडे या वळूने मोर्चा वळवला. आधी त्याने या कारला जोराची धडक मारली. त्यानंतर शिंगाने अक्षरश: कारला उचलले. एकदा नाहीतर तीन वेळा या वळूने कारला अक्षरश: उचलून आदळले. त्यानंतर कारला उलटून टाकण्याचाही प्रयत्न केला.

वळूची ताकद पाहून गावकरी चांगलेच अवाक् झाले. अखेर काही लोकांनी हिंमत दाखवून पुढे आले आणि वळूवर पाणी फेकलं. त्यानंतर वळू शांत झाला. शांत झाल्यानंतर वळूने बाजारातून पळ काढला आणि लोकांना सुटकेचा श्वास सोडला.

=======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 06:23 PM IST

ताज्या बातम्या