यवतमाळ, 29 जानेवारी : बहुजन क्रांती मोर्चाने आज पुकारलेल्या भारत बंदला यवतमाळ शहरात हिंसक वळण लागले. नागरिकत्व कायदा विरोधात देशभरात सामाजिक व राजकीय पक्षांकडून आंदोलन केले जाते आहे. दरम्यान आज बहुजन क्रांती मोर्चाने भारत बंदची हाक दिली. व्यापारी, आंदोलक आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला. बळजबरीने दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला आणि दुकानातील साहित्याची नासधूस केली. व्यापाऱ्याने आंदोलकांवर भिरकावली मिरची पावडर फेकल्याने चांगलाच तणाव निर्माण झाला. पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीमार करण्यात आला.