श्रीनगर, 05 जून : जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये आज ईदच्या उत्साहाला दगडफेकीचं गालबोट लागलं. काही तरुणांनी श्रीनगरच्या जामा मशिदीबाहेर पाकिस्तानचे झेंडे फडकवले आणि आयसिसच्या घोषणाही दिल्या या सगळ्यामध्ये न्यूज१८ नेटवर्कचे प्रतिनिधी रिफत अब्दुल्लांनी आपला जीव धोक्यात घालून सच्ची पत्रकारिता केली. त्यांना अनेकदा मोठमोठाले दगड लागता लागता राहिले. पण ते मागे हटले नाहीत आणि आमचा कॅमेरा बंद झाला नाही.