• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळालाच, पवारांचा खळबळजनक दावा
  • VIDEO : घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळालाच, पवारांचा खळबळजनक दावा

    News18 Lokmat | Published On: May 9, 2019 06:47 PM IST | Updated On: May 9, 2019 06:48 PM IST

    सातारा, 09 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत पुन्हा गंभीर शंका उपस्थित केली आहे. घड्याळाचं बटन दाबलं तरी मत कमळालाच जातं असल्याचं आपण स्वत: बघितलंय असा खळबळजनक दावा पवारांनी केला आहे. आज साताऱ्यातल्या एका ते कार्यक्रमात बोलत होते. गुजरात आणि हैदराबादमधल्या कार्यकर्त्यांनी आपल्यासमोर मशिन ठेवून बटन दाबायला सांगितलं. आपण घड्याळासमोरचं बटन दाबल्यावरही कमाळाच मत गेल्याचं आपण स्वत: बघितलं, असं पवार म्हणाले. मात्र सगळ्याच मशिनमध्ये असं होत असेल, असं मी म्हणत नाही, असं सांगत त्यांनी वाद ओढवून घेणं टाळलं. मात्र, पवारांच्या या किश्शामुळं राजकीय वर्तुळात पुन्हा कुजबूज सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी