भिंवडी, 23 जुलै : भिवंडीमधून 12 लाखांची बनावट विदेशी मद्य जप्त करण्यात आलं आहे. गटारीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाच्या ठाणे शाखेने मोठी कारवाई केली. गटारी आमवस्येनिमित्त विदेशी मद्य विकण्यासाठी आणले होते. याची माहिती मिळताच उत्पादन शुल्क शाखेने ही धडक कारवाई केली.