23 फेब्रुवारी : ज्या सचिन तेंडुलकरला सरकारनं भारतरत्न दिला. त्या सचिननं भारत-पाक क्रिकेट मॅच संबंधात मत व्यक्त केलं तर सरकारनं त्याच्यावर टीका केली, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सचिनची बाजू घेतली. परळीमध्ये ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या घरच्या मैदानात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची निर्धार सभा पार पडली. या सभेत शरद पवारांसह काँग्रेस राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.