फेक न्यूजचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व्हॉटसअॅप दर महिन्याला 20 लाख अकाउंट डिलीट करत आहे. मोठ्या प्रमाणावर मेसेज (बल्क मेसेज) पाठवणाऱ्यांच्या अकाउंटचा यात समावेश आहे. बल्क मेसेज पाठवणाऱ्या युजर्सचा शोध घेण्यासाठी व्हॉटसअप मशीन लर्निंगचा वापर करत आहे. फोर्ब्सच्या बातमीनुसार संदिग्ध मेसेज पाठवणाऱ्या अकाउंटमधील 95 टक्के युजर्सची अकाउंट डिलीट केली आहेत.