• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पतीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेची मोलकरणीला बेदम मारहाण
  • VIDEO : पतीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेची मोलकरणीला बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Dec 29, 2018 10:40 PM IST | Updated On: Dec 29, 2018 10:43 PM IST

    प्रवीण मुधोळकर,नागपूर, 29 डिसेंबर : घरकाम करणाऱ्या तरुणीवर चोरी आणि पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत मालकीण मंदा डंबारे आणि त्यांच्या मुलीने बेदम मारहाण केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात मंदा डंबारे आणि तिच्या मुलीविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मंदा डंबारे आणि त्यांच्या मुलीनं पीडितेला घरातून ओढत रस्त्यावर आणलं आणि भररस्त्यात बेदम मारहाण केली. मात्र, रस्त्यावरील एकाही व्यक्तीनं या तरुणीला त्या मायलेकींच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. पीडिता ही गरीब कुटुंबातील आहे. ती आरोप नाकारुन मायलेकींसमोर हातपाय जोडत होती. मात्र, आरोपी मायलेकींनी तिचे केस धरुन तिला रस्त्यावर खेचत आणत मारहाण केली. तरुणीला निर्दयीपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading