VIDEO बोलता बोलता डॉक्टरचे डोळे पाणावले, कोरोनाविरोधातील युद्ध लढण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा मोठा

VIDEO बोलता बोलता डॉक्टरचे डोळे पाणावले, कोरोनाविरोधातील युद्ध लढण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा मोठा

देशभरातील हजारो डॉक्टर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करीत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत कोरोना (Covid -19) व्हायरस संसर्गाची 4281 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 111 जणांचा मृत्यू झाला आहे.

अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवांमध्ये व्यस्त असणार्‍या लोकांचे मनोबल वाढतच आहे. यात डॉक्टरांचा प्रामुख्याने समावेश आहे. अनेक डॉक्टर गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून लांब राहून रूग्णांवर उपचार करीत आहे. दिल्लीतील एम्सचे डॉक्टरही संपूर्ण उत्साहाने कोरोना संसर्गाविरूद्ध लढा देत आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी कुटुंबापासून दूर असलेल्या एम्सच्या डॉ. अंबिका यांनी हे कोविड – 19 विरुद्ध युद्ध असल्याचे सांगितले आहे.

संबंधित - कोरोनाला रोखण्यासाठी 'या' राज्यात लॉकडाऊन वाढणार, CM चं पंतप्रधानांना आवाहन

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. अंबिका म्हणाल्या, 'कोविड – 19 च्या विरोधात हे युद्ध आहे. कधीकधी मला भीती वाटते की, मी आणि माझे कुटुंब या संसर्गाला बळी पडलो तर... जर मला काही झाले तर माझं कुटुंबीय मला भेटायला येऊ शकणार नाहीत आणि जर त्यांना काही झाले तर मी जाऊ शकणार नाही', असं म्हणत असताना तिचे डोळे पाणावले.

मात्र इतकं असतानाही त्यांनी कधीच मला घरी ये म्हणून सांगितलं नाही किंवा कोणतीही तक्रार केली नाही. सेवा करत राहा असंच ते मला नेहमी सांगत असल्याचे डॉ. अंबिकांनी सांगितले.

संबंधित - ‘आम्हाला क्षमा करा’, डॉक्टरांवरील दगडफेकीनंतर मुस्लीम संघटनेचा माफीनामा

Published by: Meenal Gangurde
First published: April 6, 2020, 9:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या