• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके
  • VIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके

    News18 Lokmat | Published On: Nov 19, 2018 12:14 PM IST | Updated On: Nov 19, 2018 12:14 PM IST

    विजय देसाई, 19 नोव्हेंबर : पश्चिम रेल्वेच्या धावत्या लोकलमध्ये तळीरामांनी सिगारेटचे झुरके घेत आणि दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शनिवारी रात्री चर्चगेट-विरार लोकलमध्ये तीन तळीराम लगेजच्या डब्यात बसून खुलेआम दारू पिऊन सिगारेट ओढत होते. यावेळी त्यांना काही प्रवाशांनी जाब विचारला, मात्र त्यांच्याशी या तळीरामांनी हुज्जत घातली. शनिवारी रात्री 10.18 च्या चर्चगेट – विरार लोकलमधील हा व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. रेल्वेमध्ये ज्वलनशील पदार्थ नेण्यास आणि धुम्रपानास मनाई आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही आहे. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवत धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर रेल्वे प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते याकडे प्रवाशांचे लक्ष लागले असून अशाने रेल्वे प्रवाशांची सुरक्षा मात्र धोक्यात असल्याचे समोर आले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading