औरंगाबाद, 05 ऑक्टोबर : निवडणुकांच्या तोंडावर मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक झाला. राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा आणि ओबीसी समाजाचा करण्यात यावा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चानं केली आहे. या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं कॅनॉट गार्डन इथं निदर्शनं करण्यात आली.