पुण्यात मराठा आंदोलनादरम्यान चांदणी चौकात पुणे बंगळूरु महामार्ग रोखून धरलेल्या आंदोलकांना पोलिसांनी रस्ता रिकामा करण्याचे आवाहन केल्यावर आंदोलक आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केलाय. यावेळी अश्रूधुराची नळकांडी ही फोडण्यात आलीये त्यानंतर आंदोलक पांगले.