• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : स्वीडनची तरूणी झाली सांगलीच्या पाटलाची सून!
  • VIDEO : स्वीडनची तरूणी झाली सांगलीच्या पाटलाची सून!

    News18 Lokmat | Published On: Mar 4, 2019 06:26 PM IST | Updated On: Mar 4, 2019 06:26 PM IST

    असीफ मुरसल, सांगली, 04 मार्च : सांगलीकरांमध्ये सध्या एका लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण या लग्नात वऱ्हाड थेट स्वीडनं हुनं सांगलीत दाखलं झालं. मिरजेतला हा विवाह सोहळा मिरजवासीयांसाठी औत्सुक्याचा ठरला होता. मराठमोळा मुलगा संदीप पाटील आणि मरियम दि फाईन लिंच. ही स्वीडन इथली. या दोघांनी अस्सल मराठमोळ्या चालीरितींप्रमाणे विवाह केला. गोव्यात संदीप आणि मरियमच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. वरमाला, मंगलाष्टक, सप्तपदी, कानपिळी ते अगदी कन्यादान असे सगळे सोहळे मरियमच्या घरच्यांनी अनुभवले. संदीप यांचं 12वी पर्यंतचं शिक्षण मिरजेत झालं आणि एमबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी 2003 ला ते रशियाला गेले. इथंच मरियमही शिक्षण घेत होती. यादोघांमध्ये आधी मैत्री आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. संदीप यांच्या घरच्यांनी सुरुवातीला जरा नाकं मुरडली होती. पण प्रत्यक्ष भेटल्यावर मरियमने संदीपच्या कुटुंबीयांना आपलंसं केलं आणि धुमधडाक्यात लग्न लावून दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी