• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मनमाडजवळ धावत्या रेल्वेच्या जनरल डब्यात लागली आग
  • VIDEO : मनमाडजवळ धावत्या रेल्वेच्या जनरल डब्यात लागली आग

    News18 Lokmat | Published On: Apr 22, 2019 11:29 PM IST | Updated On: Apr 22, 2019 11:29 PM IST

    बब्बू शेख, मनमाड, 22 एप्रिल : वाराणसी येथून मुंबईकडे जाणाऱ्या कामायनी एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने गाडी मनमाड रेल्वे स्थानकावर थांबल्यामुळे पुढील अनर्थ टळला. कामायनी एक्स्प्रेस मुंबईकडे भरधाव वेगाने जात होती नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ गाडी आल्यावर इंजिन पासून चौथ्या डब्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचं पाहून प्रवाशांमध्ये भीती पसरली. 20 मिनटांनंतर गाडी मनमाडला पोहोचली आणि तिथे थांबा असल्यामुळे गाडी थांबताच प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या आणि पळत सुटले. रेल्वे कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी ज्या डब्याला आग लागली होती तिथे धाव घेऊन आग आटोक्यात आणली. चाकांचे ब्रेक जाम झाल्यामुळे घर्षण होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading