मुंबई, 20 मे : राज्यात आम्हाला 45 जागा मिळतील आणि देशात आम्ही 300 हून अधिक जागा मिळवू, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसंच विरोधक अपयशाचे कारण शोधत आहेत. राज ठाकरे यांच्या बोलणे यावर लोक फिदा होत असले तरी त्यातून मते मिळणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच विधानसभेतही सेनेसोबतच असणार असा दावाही दानवेंनी केला.