वसई, 19 फेब्रुवारी : वसईत बुरशी लागलेली मिठाई रिसायकल करून बाजारात विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पालघर आणि वालीव पोलिसांनी संयुक्तपणे नायगाव पूर्वच्या वाकीपाडा भागातील श्री कृष्णा मंगल डेअरीच्या कारखान्यावर छापा मारला असता ही घटना उघडकीस आली. पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्या विशेष पथकाचे मल्हार थोरात आणि सुरेंद्र शिवदे यांच्यासह वालीव पोलिसांनी संयुक्त ही कारवाइ केली आहे. १०० किलोच्या वर बुरशी लागलेले मिठाई जप्त केले आहे. तर 150 किलो नवीन बनवलेली मिठाई जप्त केली आहे. या डेअरीत लाडू पेढे, मलाई बर्फी, अंजीर बर्फी, मिल्क केक, मावा, काजू बर्फी, बनविले जात होते. मावा बनविण्यासाठी गुजरात गोल्ड, प्रीमियम गोल्ड बर्फी दाणेदार हे पावडर व केमिकल टाकून बनवीत असताना बुरशीजन्य मिठाई जप्त करून अन्न व औषध विभागाला कळवण्यात आले आहे.