13 मार्च : मुलाच्या भाजप प्रवेशानंतर आता राधाकृष्ण विखे पाटलांनी देवदर्शनाला सुरूवात केली आहे. आधी त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. त्यानंतर कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शनही त्यांनी घेतलं. तर दुसरीकडे पार्थ पवारनं कार्लामध्ये एकवीरा देवीच्या दर्शनानं निवडणूक प्रचाराला सुरूवात केली आहे.