• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ!
  • VIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ!

    News18 Lokmat | Published On: Feb 16, 2019 08:37 PM IST | Updated On: Feb 16, 2019 08:37 PM IST

    विनय म्हात्रे, नवी मुंबई, 16 फेब्रुवारी : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. याबाबत देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. पाकिस्तान विरोधात बदल्याची भावना प्रत्येक भारतीय नागरिक व्यक्त करीत असून संतापाची लाट संपूर्ण देशभरात पसरली आहे. पण माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी या प्रश्नाला उत्तर न देता पाठ फिरवून निघून गेले. कपिल देव यांच्या या पाठ फिरवण्यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. जिथे संपूर्ण देश आपल्या जवानांचे मनोबल वाढवताना दिसत आहे. तिथे कपिल देव सारख्या ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी मात्र, साधी प्रतिक्रिया देखील देण्यास नकार देत याकडे पाठ फिरवली. कपिल देव याच्या या कृतीमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कपिल देव आज नवी मुंबईमध्ये होणाऱ्या नवी मुंबई हाल्फ मॅरेथॉन च्या निमित्ताने पत्रकार परिषदेसाठी आले होते. दरम्यान, माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनीही पुलवामा हल्ल्याबाबत दहशतवाद्यांना कोणता धर्म आणि जात नसते असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांना कपिल शर्मा याच्या कार्यक्रमातून बाहेर पडावं लागलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी