गणेश गायकवाड, अंबरनाथ, 04 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्याला मनसेसैनिकांनी चांगलाच धडा शिकवला. संदीप तिवारी या व्यक्तीने राज ठाकरे यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अंबरनाथमध्ये मनसे शहराध्यक्षांच्या जनसंपर्क कार्यालयात बोलावून या व्यक्तीला चांगला चोप दिला आणि सर्वांसमोर माफी मागायला सांगून उठाबशा काढायला लावल्या.