S M L
  • VIDEO: आधीच मेगा ब्लॉक, त्यात रेल्वे रुळाला तडा

    News18 Lokmat | Published On: Mar 10, 2019 09:32 AM IST | Updated On: Mar 10, 2019 09:32 AM IST

    मुंबई,10 मार्च : पश्चिम आणि मध्य प्रमाणेच हार्बर रेल्वे मार्गावरही आज मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मेगाब्लॉकमुळे आधीच वाहतूक विस्कळीत झालेली असताना, कुर्ला स्थानकातच हार्बरच्या रुळाला तडा गेल्याने पनवेलकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुरुस्तीचं काम सुरू असून, लवकरच वाहतूक पर्ववत होईल अशी माहिती सुत्रांनी दिली. सकाळी 11 वाजता मैगाब्लॉक सुरू होणार होता. मात्र सकाळी 8 वाजताच हर्बर मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याने पनवेलकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close