औरंगाबाद, 18 जुलै : औरंगाबाद महापालिका सर्वसाधारण सभेच्या जेवणावर एमआयएमच्या नगरसेवकांनी आज पासून बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे एमआयएम च्या सर्व नगरसेवकांनी आप आपले जेवणाचे डब्बे आणून विरोधी पक्षनेते सरिता बोर्डे यांच्या ऑफिस मध्ये एकत्र जेवण केलं. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महापालिकेच्या जेवणावर लाखो रुपये खर्च होतात. त्यामुळे जनतेच्या पैशावरील हे जेवण बंद करावे, अशी मागणी करून टीका केली होती.