• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका
  • VIDEO : महादेव जानकरांनी वाजवला ढोल, धरला तालावर ठेका

    News18 Lokmat | Published On: Jan 21, 2019 06:09 PM IST | Updated On: Jan 21, 2019 06:09 PM IST

    किरण मोहिते, 21 जानेवारी : वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असणारे नेते, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांचं आणखी वेगळ रूप लोकांना बघायला मिळालं. कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या सार्वञिक निवडणुकीच्या प्रचारासाठी महादेव जानकर आले होते. पदयाञा झाल्यानंतर बिरोबा मंदिरात दर्शनाला गेले. त्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी जानकर आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डाॅ. अतुल भोसले यांच्या गळ्यात ढोल अडकवला. जानकर यांनी ढोलाच्या तालावर थेट नाचायला सुरुवात केली. जानकरांचे हे रूप मलकापूरकरांसाठी नवं होतं. मंत्री महोदयांचा हा पवित्रा बघून कार्यकर्त्यांनीही नाचायला सुरुवात केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading