• VIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले

    News18 Lokmat | Published On: Nov 12, 2018 11:16 PM IST | Updated On: Nov 12, 2018 11:22 PM IST

    हरिष दिमोटे, 12 नोव्हेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार भगवती गावात उसाची तोडणी सुरू असताना बिबट्याची तीन पिल्ले सापडली. राहाता तालुक्यातील कोल्हार भगवती गावात देवेंद्र खर्डे यांच्या शेतात ही पिल्ले सापडली. अगदी छोटी छोटी असणारी ही पिल्ले अगदी गोंडस आहेत मात्र आता आईपासून त्यांचा दुरावा झाला. वनविभागाला कळवण्यात आले आता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या पिल्लांना पुन्हा एकदा त्यांच्या आईच्या कुशीत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. सध्या सगळीकडे उसाची तोडणी सुरू असुन बिबट्याच्या वास्तव्याचे क्षेत्र कमी होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी