गडचिरोली, 16 जुलै : गडचिरोलीतील निवासी शाळेत कंत्राटदाराकडून पुरवल्या जाणाऱ्या जेवणामध्ये अळ्या आढळल्या आहेत. याबाबत तक्रार करूनही शाळेच्या प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या शाळेत 200च्या जवळपास मुली आहेत. या शाळेत वसतीगृहामध्ये महिला अधीक्षिका तर नाहीच पण एकही महिला शिक्षिकाही नाही. त्यामुळे या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.