25 फेब्रुवारी : भारतानं नियंत्रण रेषेपलीकडे केलेल्या हवाई हल्ल्याचं देशभरातून कौतुक होतंय. पाकला धडा शिकवला गेला, त्यामुळे सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे. वर्ध्यातील शिवाजी चौकात तरुणांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.ढोल ताशाच्या गजरात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत फटाके फोडले. तर सैनिकांचं गाव म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातलं वडाळीभोई गावात देखील जल्लोष साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे कुठे पेढे वाटून, तर कुठे फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला.