अद्धैत मेहता, 11 फेब्रुवारी : पुणे महानगर पालिकेच्या महापौर दालनामध्ये आज चक्क पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनाच नगरसेवकांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. झालं असं की, पालिकेच्या महापौर दालनामध्ये आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जलपर्णींच्या निविदांच्या विरोधात आंदोलन छेडलं आणि त्यावेळी घोषणाबाजी करत असताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर तिथे आले. आणि त्यानंतर आंदोलनामध्ये गोंधळ घालत नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांना शिवीगाळ केली आणि नगरसेवक आयुक्तांच्या अंगावर धावून गेले.