S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अजित पवारांना भेटलो होतो, पण.., राज ठाकरेंचा खुलासा
  • VIDEO : अजित पवारांना भेटलो होतो, पण.., राज ठाकरेंचा खुलासा

    Published On: Mar 19, 2019 08:16 PM IST | Updated On: Mar 19, 2019 08:16 PM IST

    19 मार्च : 'आपल्याला लोकसभा निवडणूक लढवायची नाही हे मी आधीच जाहीर केलं होतं. तरीही राष्ट्रवादीकडून प्रयत्न झाले. त्यामुळे मी अजित पवारांना फोन केला होता आणि त्यांची भेट घेतली होती. या भेटीत मी त्यांना जागावाटपाबद्दल थेट विचारलं होतं. ते होत नाही तेच अशोक चव्हाण यांचाही फोन आला होता. त्यांनाही जागावाटपाबाबत आम्ही काही बोललो का असा सवाल केला होता. पण आमची कोणतीही भूमिका नसताना त्यांच्याकडून वेगवेगळी विधान कऱण्यात आली', असा खुलासा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. तसंच ही लोकसभा कोणत्या पक्षाविरोधात नाहीतर मोदी-शहा या जोडी विरोधात आहे, त्यामुळे यापुढील प्रत्येक सभा ही मोदी-शहांविरोधात राहणार आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close