अंबरनाथ, 12 सप्टेंबर : अंबरनाथमध्ये गणपती बाप्पाच्या एका मोदकाचा तब्बल ९२ हजारात लिलाव झाला. अंबरनाथमध्ये गेल्या २७ वर्षापासून खाटूश्याम मित्र मंडळ गणेशोत्सव साजरा करतात. इथं बाप्पासमोर एक मोदक ठेवण्यात येतो आणि अनंत चतुर्दशीला मोदकाचा लिलाव होतो. हा मोदक जो भाविक विकत घेतो, त्याची भरभराट होते, अशी इथल्या स्थानिकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच अनेक लोक मोदकासाठी बोली लावतात. यंदाही हा मोदक तब्बल ९२ हजार रुपयांना विकला गेला.