बेळगाव, 18 जुलै : बेळगाव जिल्ह्यातील सदलगा गावातल्या घराबाहेर उभ्या केलेल्या कारमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर कारनं पेट घेतला आणि बघता बघता गाडी जळून खाक झाली. गाडीतील एलपीजी गॅस सिलेंडरचा हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र हा स्फोट इतका भीषण होता की गाडीचा वरचा भाग पूर्णपणे उद्धवस्त झाला.