VIDEO : जेसीबीनं बैलाला चिरडणारे अखेर सापडले, इथं घडली क्रूर घटना

जेसीबीनं बैलाला चिरडण्याचा क्रूर प्रकार हा इंदापूर तालुक्यातील पोंदवडी या गावातला असल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

इंदापूर, 19 नोव्हेंबर : बैलाला जेसीबीनं चिरडल्याचा व्हिडिओने एकच खळबळ उडाली. अपेक्षेप्रमाणं न्यूज18 लोकमतच्या या बातमीचा परिणाम झाला, आणि अखेर हे क्रूरकर्मा समोर आले आहे. जेसीबीनं बैलाला चिरडण्याचा क्रूर प्रकार हा इंदापूर तालुक्यातील पोंदवडी या गावातला असल्याचं समोर आलं आहे. सर्जेराव बंडगर असं या आरोपी बैल मालकाचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब अण्णा खारतोड, सर्जेराव बंडगर आणि रोहीत शिवाजी आटोळे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बारामती विभागाचे डीवायएसपी नारायण शिरगावकर यांनी दिली.

तसंच या बैलाला जेसीबीखाली चिरडणाऱ्या गोट्या पांडोळेला आणि हा व्हिडिओ शूट करून व्हायरल करणाऱ्या लाही पोलिसांनी अटक केली आहे. पशुसंवर्धन संरक्षण कायद्यातील कलम 5 एक ब अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इंदापूर तालुक्यातील पोंधवडी या गावातला आहे. भिगवण पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचे विभागप्रमुख अजय भिसे यांनी भिगवण पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाबाबत तशी तक्रार दिली होती. या प्रकरणात कठोर आणि तातडीनं कारवाई करण्याची मागणीही त्यांनी या पत्राव्दारे केली आहे.

जेसीबीच्या सहाय्यानं क्रूरपणे बैलाची हत्या करणारी घटना न्यूज18लोकमतनं उजेडात आणली होती. या घटनेनं अख्ख्या महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. अनेक संघटना आणि कार्यकर्ते या घटनेचा शोध घेत होते. ही घटना इंदापूर तालुक्यातील पोंधवडी येथील असल्याची तक्रार केली. या तक्रारीमुळं हे क्रूरकर्मा जगासमोर आले आहेत.

Published by: sachin Salve
First published: November 19, 2019, 8:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading